| # | Description | Published on | Actions |
|---|---|---|---|
| 1 | पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी व अंमलदार यांना CPR चे प्रशिक्षण प्रशिक्षित लोकांकडून देण्यात आले होते . लोकांच्या मदत करिता व पोलीस अधिकारी व अंमलदार कर्तव्यावर असतांना अचानक हार्टॲटक आल्या नतंर मदत व्हावी करिता देण्यात आले होते . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अंमलदार बनं-२३९३ / रामदास बबनराव गव्हाने यांनी अत्यंत अभिमानास्पद कार्य केले आहे. पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे हे घरून कर्तव्यावर जात असतांना वाटेतच दि.११.०३.२०२५ रोजी दूपारी १३ः३५ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील गरीब भाजी विक्रेता रामकिसन श्रीधरराव सुलक्षणे (वय 40, रा. पेशवे नगर, छत्रपती संभाजीनगर) यांना प्रसंगावधान राखून त्यांनी तत्काळ CPR देऊन वाचवले आणि सिग्मा हॉस्पिटल येथे बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यांच्या या तातडीच्या व कर्तव्यनिष्ठ कृतीमुळे एका निरपराध नागरिकाचा जीव वाचला. ही कार्यशैली नक्कीच प्रेरणादायी आहे. पोलीस अंमलदार रामदास गव्हाने यांच्या या उल्लेखनीय कार्याचे मनःपूर्वक कौतुक . मा श्री प्रविण पवार सर , पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी गौरव केला आहे . | 04 Aug, 2025 |
Showing 0 to 0 entries
Total 0 entries